विमा छत्र योजना बाबत

विमा छत्र योजना बाबत www.mahakosh.in या website वर लिंक दिलेली आहे त्यातून सन २०१५-१६ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांची माहिती भरून त्यांची विमा छत्र योजना रक्कम संबंधित कंपनी कडे जमा करावी. त्या नंतर सदर प्रणाली मधून अंतमीकरण (Finalization) झाले नंतर त्याची प्रिंट काढून त्यावर संभदिताचा फोटो चिटकाऊन त्याची सही घेऊन दोन प्रतीत कोषागारात सदर करावी. त्याची लिंक खालील प्रमाणे :-

http://www.mdindiaonline.com/swasthya/loginpage.aspx

टीप : सदर webpage वर लॉगीन करणेसाठी DDO Code आणि Password हि DDO Code आहे.

विमा छत्र योजना सन २०१५-१६ ही DDO मार्फत राबवावयाची आहे ,फक्त सेवानिवृत्तांच्या बाबतीत ही कार्यवाही कोषागार कार्यालय मार्फत होणार आहे ,याची कृपया नोंद घ्यावी . 
संबधित कार्यवाही पुढील प्रमाणे करावयाची आहे . 
१)प्रीमिअम ची रक्कम अग्रीमाद्वारे भरावयाची  असेल तर प्रथम अग्रीमाची देयके कोषागार कार्यालयात सादर करून ती देयकाची रक्कम संबधित DDO च्या खात्यात ECS द्वारे वर्ग करणे आवश्यक राहील . धनादेशाद्वारे प्रिमिअम ची रक्कम भरू इच्छिणार्यांनी संबधित धनादेश DDO च्या खात्यांत जमा करणे आवश्यक राहील . 
२) DDO नी संबधित प्राप्त रक्कम The New India च्या बँक खात्यात ECS /NEFT ने वर्ग करून त्याचा UTR No . प्राप्त करून घ्यायचा . (Note -हा एकापासून अनेकांचा एकंच असू शकतो .)
३). BEAMS  या प्रणाली मध्ये  Other notices आणि important links अंतर्गत संबधित कंपनीची url दिली आहे ,ती click करून ddo ने नोंदणी /नुतनीकरण ची  कार्यवाही पूर्ण करायची आहे . 
४)DDO login मध्ये ddo code . type करून password च्या जागी ddo code  .वापरणे  (पहिल्यांदा login करताना ,त्यानंतर तुम्ही password बदलू शकता )
५). उपरोक्त क्रमांक २ मधील नमूद  UTR no . payment mode मध्ये type करणे . 
उदा . चार व्यक्तींच्या प्रिमिअम ची रक्कम एकत्र वर्ग केली असेल तर तोच UTR No . त्या चार ही व्यक्तींचा web form भरताना वापरायचा आहे . 
६)web form भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येणारी print out काढून ,त्यावर संबधित कर्मचारी /अधिकारी यांचा व त्यांच्या spouse चा फोटो चिकटवून ,संबधित कर्मचार्याची स्वाक्षरी घेऊन ती print out संबधित कोषागार कार्यालयात जमा करावयाची आहे . 
कोषागारांनी संबधित print outs ची DDO wise रजिस्टर मध्ये नोंद घेऊन ,त्या MD INDIA च्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करणे आवश्यक राहील . 

७)संबधित नूतनीकरणाची प्रक्रिया दिनांक २० जुलै पर्यंत पूर्ण करावयाची असल्यामुळे कोषागार कार्यालयांनी प्रिमिअम च्या अग्रीमाची देयके प्राधान्यक्रमाने पारित करावीत . तसेच नोंदणीकरणाची प्रक्रिया  ही याच महिन्यात पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे . 

List of Vimachatra of Retired Employees in 2015-16 :-


List of Vimachatra Renewal Employees list in 2015-16 :-

List of Renewal of Employees in 2015-16